मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं बिगूल वाजलंय. भारतात 2011 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 25 जून रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यानंतर क्रिकेट चाहत्यांची उत्सूकता आणखी शिगेला पोहचली.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघांनी थेट एन्ट्री घेतली आहे. तर उर्वरित 2 जागांसाठी आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत सध्या सुपर 6 राउंड खेळवण्यात येत आहे.
या सुपर 6 मधील तिसऱ्या सामन्यात 1 जुलै रोजी स्कॉटलँड विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना रंगला. विंडिजसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना होता. झिंबाब्वे आणि त्यानंतर नेदरलँड असे सलग 2 सामने गमावल्यानंतर विंडिजला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा होता.
मात्र विंडिजला स्कॉटलँडकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. विंडिजचं या पराभवासह वर्ल्ड कप पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे विंडिज वर्ल्ड कप स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सहभागी होणार नाही.
विंडिज टीमने 1975 आणि 1979 साली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय. विंडिजने 2 वेळा टी 20 वर्ल्ड कपही जिंकलाय. एकूण 4 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर पात्रता फेरीआधीच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावते हे क्रिकेट चाहत्यांनाही न पटणारं आहे. मात्र तीच खरी परिस्थिती आहे.
शाई होप याच्या नेतृत्वात विंडिजने स्कॉटलँडला विजयसाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. स्कॉटलँडने हे आव्हान 43.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पराभवानंतर विंडिजचा कर्णधार शाई होप याने प्रतिक्रिया दिली आहे.
“सामना आव्हानात्मक होणार असल्याची आम्हाला कल्पना होती. अशा सामन्यांमध्ये टॉस फार निर्णायक ठरतो. या मैदानात टॉस जिंकणारी टीम पहिले फिल्डिंगबाबत विचार करते. आम्ही निराशाजनक फिल्डिंग केली. सामन्यात कॅच ड्रॉप आणि मिसफिल्डिंग होणं स्वाभाविक आहे. मात्र असं व्हायला नको”, असं शाई होप म्हणाला.
“आम्ही कोणत्याही सामन्यात 100 टक्के प्रयत्न केले नाहीत. आमचे प्रयत्न अपुरे पडले. आम्हाला आणखी जोर लावण्याची गरज होती. आम्ही अशा स्पर्धेत सरावाविना खेळण्याचा विचारही करु शकत नाहीत.
आमचे आणखी 2 सामने बाकी आहेत. या 2 सामन्यांमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करु. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांना खेळात फक्त सातत्य आणण्याची गरज आहे”, असंही शाई होप याने नमूद केलं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज