मंगळवेढा टाईम्स न्युज ।
एका २० वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत दुखायला लागलं होतं. सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास त्रास व्हायला लागल्यावर इतक्या सकाळी कुणाला बोलवायचं म्हणून एकटाच दुचाकीवरून दवाखान्यात गेले.
पण रुग्णालयात पोहोचताच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि मृत्यू झाला. दीपक कुमार असं पोलिसाचं नाव असून ते लखनऊत माल रहीमाबाद ठाण्यात तैनात होते.
दीपक कुमार यांचं मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ड्युटीवर असतानाच त्यांना छातीत दुखायला लागलं. गॅसमुळे तसं होत असावं असं वाटलं. त्यानंतर दुचाकी चालवत थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले.
तिथं डॉक्टरांनी तपासणी केली आणि उपचार सुरू केले. दरम्यान, १० मिनिटातच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दीपक यांना कोणताही गंभीर आजार नव्हता अशी माहिती समोर येतेय.
२०१९च्या बॅचमध्ये दीपक पोलीस दलात भरती झाले होते. माल परिसरात ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचं मूळ गाव आग्रा जिल्ह्यातल्या शाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यांच्या वडिलांचंही आधी निधन झालंय.
दीपक यांच्या पश्चात आई सावित्री आणि लहान भाऊ राहुल आहे. तर बहिणीचं लग्न झालंय. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी दीपक यांच्यावरच होती. दीपक यांच्या भावानं सांगितलं की, दीपकचंही लग्न ठरवण्यासाठी हालचाली सुरू होत्या. पण तोपर्यंतच काळाने घाला घातला.
दीपकच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसही रुग्णालयात दाखल झाले. दीपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी माहिती दिली. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज