टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. पण मुळात आधीच्या तीन स्तंभावर लक्ष ठेवण्याचे काम पत्रकारितेचे आहे. त्यामुळे या तीनही स्तंभापासून अंतर राखून तटस्थ आणि सकारात्मक पत्रकारिता केली तरच प्रभावशाली लोकशाहीला बळ प्राप्त होईल अशी भूमिका मांडून
साप्ताहिक मंगळवेढा वेध परिवाराने संपादक शिवाजी केंगार यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक, राजकीय सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक व पत्रकारिता कार्यक्षेत्रांना आणखी मजबूत केल्याचे मत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यातील विविध कार्य व कर्तव्य सेवेत बहुमोल आणि आदर्शवत कामगिरी करणाऱ्या आणि गुणीजनांना साप्ताहिक मंगळवेढा वेध यांच्यावतीने पुरस्कार वितरण करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे हे उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण,आरोग्य,सहकार, समाजकारण, राजकारण, क्रीडा, कृषी, पशुसेवा, व्यवसाय, सांस्कृतिक, निवेदक अधिक क्षेत्रातील प्रेरक व्यक्तिमत्त्वांना सदर कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी जि.प.सदस्य शिवाजीराव नागणे, शिक्षक नेते सुरेश पवार, माजी उपसभापती नितीन पाटील, शिक्षक नेते शाम सरगर,
लोकनियुक्त सरपंच गुलाब थोरबोले, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, सरपंच धनाजी बिचुकले, कुशाबा पडवळे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंग हैदर केंगार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून साप्ताहिक मंगळवेढा वेध परिवाराची तालुक्यातील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील भूमिका उपस्थितांसमोर मांडली.
पुढे बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, सकारात्मक घटनांच्या वाचनामुळे समाजावर चांगला परिणाम होतो. पत्रकारितेच्या मूळ तत्वांशी असलेली बांधीलकी न सोडता बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याबाबत साप्ताहिक मंगळवेढा यांनी गेल्या १० वर्षांमध्ये मोठे विधायक प्रयत्न केले असल्याचेही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना आपले मत व्यक्त केले.
त्याचबरोबर मतदार संघातील पत्रकारांच्या असणाऱ्या विविध मागणी आणि समस्या शासनदरबारी मांडून त्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आपण नेहमी कटीबद्ध असल्याचा विश्वास ही त्यांनी यावेळी बोलताना दिला. विविध सामाजिक उपक्रमांच्या रूपाने साप्ताहिक मंगळवेढा वेध यांची सर्वसमावेशक भूमिका येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारितेला वेगळ्या उंचीवर नेऊन गत वैभव प्राप्त करून देईल असा विश्वासही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे संजय गेजगे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, प्रा.सचिन इंगळे, संपादक प्रमोद बिनवडे, मधुकर भडंगे, माजी सरपंच रतिलास केंगार, नाना हेगडे, विलास काळे, म्हाळाप्पा शिंदे, महादेव धोत्रे, सचिन हेंबाडे, प्रसाद कसबे, रोहिदास भोरकडे, आदी पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. निवेदक संतोष मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर संपादक शिवाजी केंगार यांनी सर्वांचे शेवटी आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज