टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज एक जून रोजी आठवडी बाजार बंद करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे.
All week market in Solapur district The livestock market will remain closed till this date
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज