मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सणासुदीत किंवा लग्नसाईराच्या हंगामात सोन्याचे दागिने खरेदी करताना आता मध्यवर्गीय लोकांना आता विचारात पाडले आहे. गेल्या काही वर्षात आपण सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना पाहिले आहे.
काही वर्षांपूर्वी सोन्याचा भाव 50000 रुपयांच्या आत असायची तर आता तेच सोनं एक लाख रुपयांच्याही पुढे पोहोचले आहे.
अशा परिस्थितीत, खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे तर गुंतवणूकदारांची मात्र चांदी झाली आहे. दिल्लीमध्ये सध्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 1,02,640 रुपये असून 22 कॅरेट सोन्याची किंमतही जवळपास तितकीच आहे.
सोन्याबाबत भविष्यातील संकेत काय?
याशिवाय देशातील बहुतेक शहरांमध्येही सोन्याचा दर कमी-अधिक प्रमाणात समानच आहे. कधीकाळी सोन्याची किंमत 30 हजार रुपये असायची तर आता जुलै 2025 पर्यंत सोनं लखपती बनलं आहे.
याशिवाय गेल्या 6 वर्षातील सोन्याच्या किमतींनी 200 टक्क्यांची उभारी घेतली त्यामुळे आता भविष्यातील सोन्याच्या संकेतांबद्दल जाणून घेण्यात लोकांमध्ये फारशी उत्सुकता पाहायाला मिळत आहे.
सोन्याच्या दरवाढीचे कारण काय?
सोन्याची अलीकडची दरवाढ पाहून तुमच्या मनात असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की सोन्याचे दर का वाढत आहेत? सोन्याच्या किमती वाढण्यामागे जागतिक तणाव प्रमुख कारण मानले जात आहे.
एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इराण आणि इस्रायल अजूनही गाझामध्ये खुनी खेळ खेळत आहे. याशिवाय, कोविड-19 आणि आर्थिक अनिश्चिततेमुळेही सोन्याच्या किमती वाढत आहेत.
अशा अस्थिर परिस्थितीत, गुंतवणुकीसाठी सोनं नेहमीच सुरक्षित आणि हमी परताव्याचा मार्ग राहिला आहे. एप्रिल 2025 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,01,078 रुपयांवर पोहोचला.
अशा स्थितीत, लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार सोन्याच्या अलीकडच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पुढील 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2,25,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते असा तज्ञांचा अंदाज आहे.
2019 ते 2025 या काळात सोन्याची किंमत दरवर्षी 18% वाढली आहे. त्यामुळे हाच ट्रेंड पुढेही सुरु राहिला तर किंमत 2.5 लाखांपर्यंत पोहोचतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज