टीम मंगळवेढा टाईम्स।
उजनी धरणात सध्या १२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दौंडवरुन धरणात ३६ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने असून
भीमा नदीत ८० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूरसह मंगळवेढा भीमा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कचे आवाहन करण्यात आले आहे.
उजनी धरण ऑगस्टमध्येच पूर्ण भरले असून सध्या धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
तसेच दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ते अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. उजनी जलाशयावरील खडकवासलासह १९ धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा होत आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे.
गेली दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार (दि. १६) उजनी धरणातून ८० हजार क्युसेक इतके पाणी सोडले जात आहे. तसेच उर्जा निर्मितीसाठी १६०० क्युसेक, पाणी सोडले जात आहे.
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपुराती चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे.
यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत.
सध्या धरणात येणारा पाण्याचा विसर्ग पाहता नदीतील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वीर धरणातील नीरा नदीत सोडलेले पाणी संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने या दोन्ही धरणांचे पाणी थेट पंढरपूरमध्ये येत असते. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातच पंढरपूरकरांवर पुराचा धोका संभवण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज