मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोशल मिडीयावर बौध्द समाजाविषयी अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्या राम गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा सिध्दार्थ लोकरे यांनी पोलिस अधिक्षक सोलापूर यांना एका निवेदनाव्दारे दिला आहे. Warning of fast if no case is registered against Ram Gaikwad
दि.१७ जून रोजी सोशल मिडीयावर राम गायकवाड रा.गुरसाळे ता . पंढरपूर याने व्हिडिओ क्लिप तयार करून बौध्द समाजाविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्या संदर्भात दि . १८ जून रोजी मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांना राम गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला होता.
परंतू आजतागायत त्यांनी कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने माइया अर्जाची दखल घेतलेली नाही. मी तोंडी विचारणा केली असता त्यांनी मला उडवाउडवीची व तुझा अर्ज पंढरपूरला पाठविलेला आहे असे उत्तर दिले. राम गायकवाड याने व्यक्तिगत कुठल्या एका व्यक्तीबदद्ल ते वक्तव्य केलेले नसून त्याने संपूर्ण देशातील व राज्यातील अनुसूचित जाती विषयी वक्तव्य केलेले आहे.
त्यामुळे त्याच्यावर मंगळवेढा पोलिस ठाणे या ठिकाणीही गुन्हा दाखल करण्यात यावा , तसेच टाळाटाळ करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच दि . ३० जूनपर्यंत राम गायकवाड याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनूसार गुन्हा दाखल होवून अटक न झालेस दि . १ जुलै २०२० पासून उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा विभाग या ठिकाणी मी बेमुदत उपोषण करणार असल्याचे सिध्दार्थ लोकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री , गृहमंत्री , वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर , पालकमंत्री ना . दत्तात्रय भरणे , आ.भारत भालके , जिल्हाधिकारी , उपविभागीय पोलिस अधिकारी , पोलिस निरिक्षक यांना पाठविल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज