टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. ही तिसऱ्या लाटेची चाहुल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासनास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामीण भागात आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टेस्टिंग वाढविण्यात आले असून, ज्या नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घेतली नाही,
ज्यांनी अद्याप बूस्टर डोस घेतला नाही , त्यांचे तात्काळ लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे याप्रसंगी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्राचे अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून ,
या संदर्भात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत . विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
त्याबरोबरच शाळा आरोग्यदायी वातावरणात सुरू व्हाव्यात यासाठी शाळेच्या स्वच्छता निर्जंतुकीकरण व शिक्षकांचे लसीकरण यासंदर्भात शिक्षण विभागाला , संबंधित शाळांना लेखी सूचना देण्यात आल्याचेही याप्रसंगी बोलताना स्वामी म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज