टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेची अंतीम प्रभाग रचना काल प्रसिद्ध झाली. नगरसेवकांची संख्या 17 वरून 20 झाली आहे.
नव्या रचनेनुसार अनेक प्रस्थापितांचे भाग सुरक्षित झाले, तर काहींना आगामी निवडणुकीत फटकाही बसू शकतो.
नव्या रचनेमुळे पालिकेतील राजकीय गणिते बदलू शकतात. मोठ्या प्रभागात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या नजरा असतील, असा अंदाज राजकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना काल दि.९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १ वगळता २ ते १० प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मंगळवेढा नगरपरिषद प्रभाग रचनेवर चंद्रशेखर कोंडूभैरी, सोमनाथ माळी , प्रतिक किल्लेदार यांनी हरकती घेतल्या होत्या. त्या मान्य करण्यात आल्याने त्यांच्या मागणीला यश आले आहे.
यंदा प्रथमच ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात नगरपालिकेत ओबीसी प्रवर्गाचा नगरसेवक नसणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे ३ सदस्यांची वाढ झाली.
आपला बिझनेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पोहोचवा.
आजच करा संपर्क :
9970 76 6262
मंगळवेढा नगरपरिषदची प्रारूप प्रभाग रचना फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या प्रभाग रचनेवर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, सोमनाथ माळी, प्रतिक किल्लेदार यांनी हरकती घेऊन सदर प्रभाग रचना शासनाच्या नियम व निकषानुसार झालेली नसून
मुख्याधिकारी यांनी मनमानी पद्धतीने प्रभाग रचना केल्याची हरकत नोंदवतांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग तयार करण्यात आले नसल्याबाबत त्यांनी हरकती दिल्या.
प्रभाग रचनेच्या हरकतीवर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन हरकदाराचे म्हणणे मान्य केले होते. त्यावर काल निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचनेतील २ ते १० प्रभागात बदल करून अंतिम प्रभाग रचना काल प्रसिद्ध केली.
दरम्यान, नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप यांनी शहरात केलेल्या विकास कामामुळे शहरवासीय आपल्या गटासोबत असून आपण सहकऱ्यांच्या मदतीने मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढविणार असून आपल्या गटातील निवडणूक लढाविणाऱ्या उमेदवारांवर कोणताही फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
प्रभाग रचनेमध्ये सरासरी २१८२ लोकसंख्या गृहित धरून नव्या निकषाप्रमाणे तयार झालेल्या प्रभागातील एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती लोकसंख्या व अ.जमाती लोकसंख्या आणि प्रमुख ठिकाणी पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक १- लोकसंख्या २२८४ , अ.जा. १४४ , अ.ज. ५ उजनी वसाहत कृष्ण नगर , नागणेवाडी झोपडपट्टी .
प्रभाग २- लोकसंख्या २३०३ , अ.जा. २०५ अ.ज. ४ , होलार वस्ती , दुर्गामाता नगर , दामाजी मंदिर , मुलाणी गल्ली , मुरडे गल्ली,
प्रभाग ३ लोकसंख्या २२०३ , अ.जा. ९९ ४ अ.ज. १ ९ , साठेनगर , ग्रामीण रुग्णालय , अवताडे वखार , दूरदर्शन परिसर , खंडोबा गल्ली.
प्रभाग ४ लोकसंख्या २१३७ अ.जा. २१३ , अ.ज. २३ , बत्ती चौक , रोहिदास गल्ली , गुंगे – घुले गल्ली , चांभार गल्ली .
प्रभाग ५ – लोकसंख्या २२५५ , अ.जा. १५ , अ.ज. १३ , मुढे गल्ली , सुतार गल्ली , मारवाडी गल्ली , मुजावर गल्ली , चोखामेळा चौक.
प्रभाग ६- लोकसंख्या २३५४ अ.जा. ६५ , प्रांत कार्यालय , किल्ला भाग , महादेव मंदिर , मेटकरी गल्ली .
प्रभाग ७- लोकसंख्या २२१८ अ.जा. ६६ , अ.ज. १ , सनगर गल्ली , बेरड गल्ली , शिवाजी तालीम , बुरुड गल्ली .
प्रभाग ८- लोकसंख्या २०२१ , कोंडूभैरी गल्ली , होनमाने गल्ली , भगरे गल्ली , माळी गल्ली .
प्रभाग ९- लोकसंख्या २१५५ , अ.जा. ३१ , अ.ज. २०, मंडई परिसर, न्हावी गल्ली , जगदाळे गल्ली , हजारे गल्ली , गैबीपीर दर्गा
प्रभाग १०- लोकसंख्या १८९७, अ.जा. ८ ९ ६ , अ.ज. १०५ , सराफ गल्ली , कोळी गल्ली , बोराळे नाका.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज