मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची आहे? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर निवडणूक लढवायची असेल तर सरकारनं लागू केलेली नवी पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.

कारण आता पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे.

ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकी मोठी आहे, हे कमी करणं एक मोठं आव्हान ठरतेय. यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. यात समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे.

तर पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीय.

मंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील सरपंच कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री बोलत होते. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.

गावातील प्रश्न गावातच सुटण्यासाठी ग्रामविकास काम करत आहे.

शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिलीय.

गावामधील थकीत कराची मोठी समस्या असते. हा कर नियमितपणे शासनाच्या तिजोरीत जमा होण्यासाठी अभियान कालावधीत एकरकमी कर भरणाऱ्यांना ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं मंत्री गोरे यांनी सांगितलं.
कार्यशाळेत गायरान जमिनीवर घरकुलास परवानगी मिळत नसल्याची तक्रार चपळगावचे सरपंच सिद्धाराम यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुलांसाठी सर्व अटी व नियम शिथिल केले असल्याचं सांगितलं.

९० दिवसात घरकुलांची कामे पूर्ण करायची असतील, तर या अडचणी प्राधान्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत. वेळ पडली तर नियम बदलू, कायदा बदलू पण कामे थांबली जाणार नाहीत, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिले.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू होणार.
५ वर्षांत थकबाकी नसलेली व्यक्तीच निवडणुकीस पात्र.
समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कर थकबाकीवर ५०% माफी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











