टीम मंगळवेढा टाईम्स।
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून या महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह परराष्ट्रमंत्री देखील या बैठकीला हजर होते.
या बैठकीत वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेऊन घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानची पूर्णत: कोंडी करण्यात आली आहे.
पराराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर माहिती दिली. त्यानुसार, पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लष्कर आणि संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांना पूर्ण ब्रिफिंग करण्यात आले. त्यानंतर, अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे.
तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे.
सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दिल्लीमध्ये CCS ची बैठक झाली. साधारण अडीच तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तासोबतच्या सिंधू पाणीवापटाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अशी घोषणा केली. पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
सिंधू पाणीवाटप करार नेमका काय आहे?
सिंधू पाणीवाटप करार हा 1960 साली करण्यात आला होता. या कराराअंतर्गत रावी, सतलज आणि बियास या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले. तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले.
1960 सालापासून याच कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाणीवाटप होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जेव्हा-जेव्हा बिघडले तेव्हा-तेव्हा हा करार भारताने रद्द करावा, अशी मागमी केली जात होती. आता मात्र भारताने या कराराला प्रत्यक्ष स्थगिती दिली आहे.
या निर्णयानंतर पाकिस्तानची कोंडी कशी होणार?
भारताच्या या करारानंतर पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे. कारण सिंदू जलवाटप करारातून मिळणाऱ्या पाण्याच्या मदतीनेच पाकिस्तानमधील बराच भाग सिंचनाखाली येतो. याच पाण्यावर पाकिस्तानचे काही उद्योगधंदेही अवलंबून आहे. त्यामुळे भारताने सिंधू नदी करार थांबवल्याने पाकिस्तानची कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने चांगलीच कोंडी होणार आहे. म्हणजेच पाकिस्तानला एका प्रकारे मोठी आर्थिक झळही बसू शकते.
दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या निर्णयानंतर आता पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारत सरकारचे पाच मोठे निर्णय
१९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने रद्द केला आहे. पाकिस्तानवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यांनी १ मेपर्यंत माघारी यावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आलेला आहे.
एका आठवड्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज