टीम मंगळवेढा टाईम्स ।
शैक्षणिक जीवनातील दहावी व बारावीचे वर्ष हे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी २४ तास अभ्यासात व्यस्त राहण्यापेक्षा वेळेचे योग्य व्यवस्थापन करत
कमी वेळ पण प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, मोबाइल, टीव्हीपासून दूर रहावे, असा सल्ला राज्यात पहिली आलेल्या वृषाली पप्पू कोरे हिने दिला.
मंगळवेढा वीज बोर्ड जवळील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने 100 पैकी 100 % गुण मिळून राज्यांमध्ये प्रथम आलेले वृषाली कोरे हिचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी वृषाली बोलत होती.
याप्रसंगी सारा कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा सागर पाटील सर, पूजा पाटील मॅडम, स्मिता रायबान मॅडम, वैष्णवी उन्हाळे मॅडम, प्रदीप भिंगे सर तसेच इन्स्टिट्यूट मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागर पाटील सर बोलताना म्हणाले की, जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने झेपावण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात,
असेच कौतुकास्पद व प्रेरणादायी यश मंगळवेढा येथील एका सामान्य कुटुंबातील वृषाली पप्पू कोरे हिने सर्वांची मान उंचावत १०० टक्के गुण मिळवून राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला आहे.
जिद्द, परिश्रम व तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने राज्यात प्रथम येण्याचे यश मिळवले आहे. वृषाली हिने दहावी परीक्षेत यश संपादन करून कुटुंबीयांची मान उंचावली.
पुढे आयआयटी करण्याचे ध्येय बाळगले आहे. तिला समाजाची सेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.
अशाच पुढे आयआयटी करण्याचे ध्येय बाळगले आहे. तिला समाजाची सेवा करायची आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज