मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण आषाढी एकादशीत विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखले. त्याचा परिणाम पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळाले नाही, हा कारखाना यंदाच्या गळीत हंगामात सुरू झाला नाही. त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. आपण मराठा मोर्चाचा आपण बळी ठरलो असल्याची कबुली आमदार भालके यांनी दिली आहे.
आरक्षणासाठी राज्यभर पेटलेल्या मराठा क्रांती मोर्चाचा आपण बळी ठरला असल्याची माहिती पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी आज जाहीर सभेत दिली.
विठ्ठल कारखान्याने हंगामपूर्व कर्ज मागणीसाठी सर्व प्रक्रिया राबविली होती.कारखान्याच्या बाबतीत बॅंकेने एनडीआरचा नवीन नियम लागू केला त्यामुळे या कारखान्याला कर्जपुरवठा होऊ शकला नाही. राज्यातील ४२ तर सोलापूर जिल्ह्यातील १८ साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात बंद आहेत.
विठ्ठल कारखाना माझ्यामुळेच बंद राहिला हे माझ्या विरोधकांनी जनमानसात पसरविले असल्याचा आरोपही आमदार भालके यांनी केला. सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील आज पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरला आले होते. त्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.या मेळाव्यात जिल्ह्यातील व शहरातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज