टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या डिसेंबर २०२३ अखेर सर्व नित्य पूजेची नोंदणी पूर्ण झाली आहे. या पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला १४ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून
दररोज होणाऱ्या तुळशी अर्चन पूजेलाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची दररोज पहाटे नित्य पूजा केली जाते. नोंदणी करून ठरलेल्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या दहा ते बारा नातेवाईकांना नित्य पूजेसाठी सकाळी मंदिरात प्रवेश दिला जातो.
नित्य पूजा सुरू असताना देवाच्या मूर्तीवर केशर पाण्याने स्नान घालण्याची संधी भाविकांना मिळते. रुक्मिणी मातेस हळद, कुंकू लावून, देवाला पेढे नैवेद्य आणि फळांचा महाप्रसाद पूजा करणाऱ्यांच्या हस्ते दाखवला जातो. त्यामुळे या नित्य पूजा करण्यासाठी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो.
३१० नित्यपूजेची नोंदणी
वर्षभरात होणाऱ्या चार प्रमुख यात्रा आणि त्यांचा कालावधी वगळता ३१० दिवस श्री विठ्ठलाच्या नित्य पूजा नोंदणी केल्या जातात. तसेच रुक्मिणी मातेकडे १५० च्या दरम्यान पूजा नोंदणी होत असतात.
यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात होणाया श्रीविठ्ठलाच्या ३१० नित्य पूजेची नोंदणी पूर्ण झाली आहे. या नित्य पूजेतून मंदिर समितीला ९४ लाख रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले असल्याची माहिती पुदलवाड यांनी दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज