टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
केलेल्या कामांचे मूल्यांकन करून या पुरस्कारासाठी मंगळवेढा पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष ग्रामसेवक विठ्ठल लिगाडे, प्रवीण भोरकडे, श्रीमती संगीता माने व अनिल इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
विठ्ठल लिगाडे हे सध्या लवंगी, प्रवीण भोरकडे हे कात्राळ, श्रीमती संगीता माने या तांडोर-तामदर्डी येथे तर अनिल इंगळे हे लवंगी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
करोना काळात यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल शासनाने घेऊन वरील चौघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
राज्यशासनाच्या निर्णयानुसार ग्रामविकास, ग्रामस्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, हगनदारी मुक्त गाव, आरोग्य, विकास योजना, उपक्रम, मिळकतकर वसुली अशा सर्व पातळ्यांवर सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केले आहे.
शिवाय ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य
जनतेचे रहाणीमान उंचावनयास मदत करणाऱ्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना दरवर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात.
त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने 2019-20 साठी विठ्ठल लिगाडे (कचरेवाडी), 2017-18 साठी प्रवीण भोरकडे (घरनिकी),
2020-21 साठी श्रीमती संगीता माने (तांडोर-तामदर्डी ) तर 2018-19 साठी अनिल इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीमूळे अरळी,कचरेवाडी, कात्राळ, घरनिकी, तांडोर-तामदर्डी व लवंगी या परिसरात आनंद व्यक्त केले जात असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज