टीम मंगळवेढा टाईम्स ।
तौक्ते वादळाच्या तडाख्यानतंर मृत्यू समोर आ वासून समोर होता… लोकांनी टायटॅनिकच थरार चित्रपटात पाहिला.. मात्र आम्ही डोळ्यासमोर बार्ज तुटताना , नागरिक बार्ज मधून उड्या मारताना, समोरून मृतदेह वाहताना बघून काळजात धडकी भरली होती.
सलग १४ ते १५ तास जीवनमरणाशी झुंज सुरू होती अखेर भारतीय नौदलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून आमचे प्राण वाचवले. भारतीय नौदल हे आमच्यासाठी देवदूतांसारखे धावून आल्याची भावना व्यक्त करीत खुपसंगी ता.मंगळवेढा येथील विश्वजीत बंडगर या तरुणाने थरारक अनुभव सांगितला.
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील विश्वजीत बंडगर हा तरुण युटोपियन साखर कारखान्यात इंजिनिअरिंग विभागात चार ते पाच वर्षे कामास होता. त्यानंतर तो मुंबई येथे समुद्रात बोटीवर वेल्डरचे काम करण्यासाठी गेला होता.
दरम्यान दोन दिवसांत तौक्ते वादळाने हाहाकार उडाला आहे. या वादळात विश्वजीत बंडगर काम करत असलेली बोट देखील बुडाली होती. या बोटीत जवळपास ३०० कामगार कामावर होते.
जो-तो जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. या कामगारांचा जीव वाचवण्यासाठी भारतीय नौदल धावून आले. त्यांनी या बोटीतील अनेकांचा जीव वाचवला. सुखरूप सुटका झाल्यानंतर कामगारांनी भारत माता की जय चा जयघोष करत नौदलाचे आभार मानले.
त्यानंतर सुखरूप सुटका झालेल्या विश्वजीत बंडगर यांनी भारतीय नौदलाचे आभार मानत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तौक्ते वादळ येणार याची कल्पना होती, पण कंपनीच्या वतीने काहीही सांगितले नव्हते.
आमच्या सोबत असणारे बार्ज निघून गेले होते. लोकांनी टायटॅनिकच थरार चित्रपटात पाहिला आहे. मात्र आम्ही डोळ्यासमोर बार्ज तुटताना , नागरिक बार्ज मधून उड्या मारताना , समोरून मृतदेह वाहताना बघून काळजात धडकी भरली होती.
सलग १४ ते १५ तास लाईफ जॅकेटला धरून जीवनमरणाशी झुंज सुरू होती. आम्ही वाचू अशी आम्हाला आशा होती, एकमेकांना आधार देत होतो. अखेर भारतीय नौदलाच्या जवानांनी आमचा जीव वाचवला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज