मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
तळ कोकणात निसर्ग सौंदर्य अफाट असल्याने इकडे मुंबई, पुणेकरांसह परप्रांतीयांकडून गुंतवणूक होताना दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस केले जात आहेत.
शेत जमिनी घेऊन त्या विकसित केल्या जात आहेत. ज्यामुळे काही ठिकाणी मूळ नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून त्याचा थेट नैसर्गिक जलस्त्रोतांवर परिणाम होत आहे. यामुळे तळ कोकणातील चिपळूण तालुक्यातील एका गावाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हा निर्णय घेताना दुसऱ्या तालुक्यातीलच काय तर दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना विक्री न करण्याचा ग्रामपंचायतील एकमुखी ठरावच करून घेतला आहे. यामुळे आता या गावाची राज्यभर चर्चा होत असून परराज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील असो किंवा आपल्याच जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यातील लोकांनाही जमिन घेता येणार नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीने हा ठराव केला आहे. या ठरावा प्रमाणे गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या वेळी आर्थिक संकंटामुळे कोणाला जमीन विकायची झाल्यास ती फक्त गावातील व्यक्तिला घेता येणार आहे.
दरम्यान मोरवणे ग्रामपंचायतीने हा निर्णय घेण्यामागे जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारातूनही काही दलाल गब्बर झाले आहेत. यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन उरणार नाही, असा धोका असल्यानेच निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. तसेच गावाच्या हद्दीतील जमिनी या गावकऱ्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवायला हव्यात अशी भूमिका ग्रामस्थांची आहे.
तळ कोकणात निसर्ग सौंदर्य अफाट असल्याने बाहेरचे लोक येथे लाखोंची गुंतवणूक करत आहेत. जमिनी घेत आहेत. यामुळे ग्रामीण संस्कृतीचा बाज कमी होत असून गावाचा सामाजिक समतोल बिघडताना दिसत आहे.
तर बाहेरचे लोक जमिनी घेत असल्याने आता स्थानिक तरुणांना शेतीसाठीच काय तर घरे बांधण्यासाठीही जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच हा ठराव करण्यात आला आहे. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही.
मात्र तो गावाच्या सामाजिक विकासासाठी बंधनकारक आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनीच आता या ठरावाच्या अंमलबजावणी जबाबदारी घेतली आहे. तसेच जर कोणी या ठरावाच्या विरोधात जावून जमीन विकण्याचा प्रयत्न केलाच तर ग्रामसभा घेऊन त्याला विरोध करण्याचीही भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज