टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.
त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
दहावीसाठी साधारणत 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे.
अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
बेकायदा वाळूचोरी प्रकरणी चौघांना अटक
ब्रह्मपुरी हद्दीत भीमा नदीच्या काठावर बेकायदेशीर वाळू टेंपोमध्ये भरत असताना पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून टेंपोसह १ लाख ३ हजाराचा मुद्देमाल जप्त करून तुकाराम दादा पवार ( वय -२१ ) , रामा अशोक आवताडे ( वय -२० ) व विजय संभाजी जावळे ( वय -२६ ) तिघे राहणार मंगळवेढा , आण्णा भिवा कोकरे ( वय -३५ , रा.ब्रह्मपुरी या चौघांना वाळूचोरी प्रकरणी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की , ब्रह्मपुरी हद्दीत यातील आरोपी आण्णा कोकरे याचे भीमा नदीकाठावर शेत असून या शेतातून नदीपात्राकडे वाहने जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला आहे . यारीच्या साह्याने २० ब्रास वाळूसाठा केला होता.
या वाळूसाठ्यातून वाळू पुरविली जात असल्याची कुणकुण पोलीस प्रशासनाला लागल्यानंतर दिनांक २६ रोजी रात्रौ ९ वाजता पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे निळ्या रंगाचा टेंपो (क्र.के.ए.२८-३५४२ ) यामध्ये सदर आरोपी वाळू भरत असल्याचे फिर्यादी पोलीस शिपाई अजित मिसाळ यांच्या निदर्शनास आले.
पोलीसांनी वाळू व टेंपासह १ लाख ३ हजाराचा मुद्देमाल जप्त करून वरील चौघा आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
या कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. याचा अधिक तपास पोलीस नाईक संतोष चव्हाण करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज