टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली आहे.
आज दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा व शिरनांदगी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीची वीण अधिक घट्ट केली जाणार आहे.
आवताडे शुगर येथे वृक्षारोपण तसेच मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नगरपरिषद शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना २२ हजार वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
तरी वरील सामाजिक उपक्रम कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सोमनाथ आवताडे यांनी केले आहे.
आ.आवताडे यांनाच पुन्हा आमदार करण्याचे फडणवीस यांचे संकेत, पण …..; कान भरणारांची संख्या ओळखून प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद देणं गरजेचं
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आ समाधान आवताडे यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध संपूर्ण राज्याला माहीत आहे.
समाधान आवताडे यांच्याकडे आमदारकी नसताना व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दामाजी कारखान्याच्या मोळीपूजनाला फडणवीस यांनी हजेरी लावली होती.
त्यानंतर प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांचे मनोमिलन करत पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्या प्रचारात फडणवीस यांनी मतदारसंघ पिंजून काढत समाधान आवताडे यांना निवडून आणले.
त्यानंतर आ.आवताडे यांच्या ताब्यात असणारा दामाजी कारखाना परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी भालके राष्ट्रवादीच्या मदतीने समविचारी आघाडी करून घालवल्यानंतर आ.समाधान आवताडे यांनी खासगी कारखाना खरेदी करून त्या कारखान्याचे मोळी पूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार अवताडे यांच्यावर स्तुती सुमने उधळत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व आमदार अवताडे यांनी ज्या ज्या कामांची मागणी केली आहे.
त्या सर्व कामांना मी निधी देणार असून पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ताठ मानेने जनतेसमोर पाठवणार असल्याचे सांगत त्यांनी पुढील उमेदवार हे समाधान आवताडेच असतील याचे संकेत दिले आहेत.
दामाजी कारखाना निवडणुकीनंतर परिचारक व अवताडे यांच्यामध्ये काही मतभेद असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जाऊ लागले होते.
या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी भालके गटाशी संधान साधत अवताडे यांना विरोध करून निवडणूक लढवली व परिचारक-भालके युतीने ही निवडणूक जिंकली असली तरी
या निवडणुकीमध्ये उघडपणे प्रशांत परिचारक सहभागी झाले नाहीत मात्र कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे सत्कार समारंभ करुन त्यांना मार्गदर्शन करत दामाजी कारखाना व्यवस्थित सुरू ठेवला आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रशांत परिचारक व समाधान आवताडे दोघे हसत खेळत सहभागी झाल्याचे दिसत आहे पण कार्यकर्त्यांमध्ये दोन गट होत असल्यामुळे प्रशांत परिचारक यांच्या मनात नेमकं काय आहे.
हे अजून कळू शकलं नाही नेत्यांची उघड उघड दोस्ती दिसत असली तरी मंगळवेढ्यातील खालच्या कार्यकर्त्यांची कुस्तीही उघडपणे दिसून येत आहे या कार्यकर्त्यांच्या कुस्ती लावण्यामध्ये परिचारकांचा छुपा हात आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनाच स्वहितासाठी अवताडे व परिचारक यांची दोस्ती तोडायची आहे हे समजेनासे झाले आहे.
सध्याच्या घडीला अवताडे व परिचारक या दोघांनी आमच्या दोघांमध्ये मतभेद आहेत हे कुठेही जाणवू दिले नसले तरी कार्यकर्ते मात्र उघड उघड एकमेकांच्या डिजिटलवरही एकमेकांचे फोटोही छापेनासे झाले आहेत.
त्यामुळे येत्या काळात दोघांना आपली दोस्ती टिकवायची असेल व विधानसभेला आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर कार्यकर्त्यांमधील मतभेद संपवावे लागणार आहेत राजकारणामध्ये कान भरणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या ही जास्त असते.
त्यामुळे गटाचे,पक्षाचे नेतृत्व करत असताना असे कार्यकर्ते ओळखायला हवेत अन्यथा असे कार्यकर्ते नेत्यांच्या मनात विष पेरून राजकारण संपवायलाही कमी करत नाहीत.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या अवताडे परिचारक व भालके हे प्रमुख तीन गट असून या तिन्ही गटांमध्ये कान भरणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या जागी ठेवून या नेत्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद दिली तर येणारा काळ त्यांच्यासाठी चांगला असणार आहे.
अवताडे शुगर च्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमांमध्ये फडणवीस यांचा उपस्थितीत विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक हे व्यासपीठावर उपस्थित राहून दोघांमध्ये काही मतभेद नसल्याचे फडणवीस यांच्या समोर तर दाखवून दिले असले तरी कार्यकर्त्यांमधील मतभेद दडून राहिले नाहीत अशा परिस्थितीमध्ये
फडणवीस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीला आमदार आवताडे यांनी मागणी केलेली सर्व कामे पूर्ण करून त्यांना ताठ मानेने जनतेसमोर पाठविणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आगामी काळात फडणवीस यांच्याकडून अवताडेंनाच ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज