टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे धोतर फेडणाऱ्याला
सोलापूर शिवसेनेच्या वतीने 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी जाहीर केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता सुधांशू तिवारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्ध
सोलापूर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, उपशहरप्रमुख सुरेश जगताप, लहू गायकवाड, संदीप बेळमकर, अमित भोसले, संताजी भोळे, अजय खांडेकर, अनिल काsंडूर, विजय पुकाळे, समन्वयक भैय्या धाराशिवकर उपस्थित होते.
राज्यपालांचा निषेध करण्यासाठी कल्याण शहरातील शिवपेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारीही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. ‘राज्यपाल चले जाओ’ या घोषणांनी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
नवी मुंबईत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, काँग्रेसचे संतोष शेट्टी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, मिलिंद सूर्यराव, शहरप्रमुख विजय माने,
सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, महेश कोटिवाले, विजय चांदोरकर, संदीप पवार, सतीश रामाणे, अरुण गुरव, समीर बागवान, राजेश पोसम, अजय पवार, सचिन नाईक, गंगाराम पाटील आदी सहभागी झाले होते.
राज्यपालांचे प्रतीकात्मक धोतर जाळले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने नाशिकच्या सातपूरमध्ये रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जोरदार निषेध करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडने राज्यपालांचा निषेध करीत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारले. या आंदोलनात नितीन रोठे-पाटील, मंदार धिवरे, चेतन शिंदे, प्रतीक पगार,
प्रफुल्ल वाघ आदी सहभागी झाले होते. सर्वपक्षीय शिवप्रेमींच्या वतीने दुसरे आंदोलन सातपूरमध्येच झाले. राज्यपालांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले, त्यांचे प्रतीकात्मक धोतर जाळले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज