टीम मंगळवेढा टाईम्स ।
आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा व पंढरपूर येथे विविध आवताडे कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी दिली.
आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज मंगळवारी सकाळी नऊ ते पाच या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याच दिवशी प्रत्येक गावोगावी पशुसंवर्धन विभाग व खासगी पशुचिकिस्तक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नावनोंदणी प्रारंभ करण्यात येणार आहे. ही नावनोंदणी आमदार आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात व आवताडे शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नंदूर येथे करण्यात येणार आहे.
दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये मोतीबिंदू तपासणी, शस्त्रक्रिया व गरजूंना चष्मेवाटप करणार आहेत.
तर १० डिसेंबर रोजी मोफत जयपूर फूट नोंदणी व मोजमाप, कृत्रिम अवयव, हात व पाय आदींचे आयोजन तनपुरे महाराज मठ, पंढरपूर येथे केले.
यासाठी २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती, मंगळवेढा यांच्या वतीने जवाहरलाल हायस्कूल येथे करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज