टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे.
आता वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावर धावणार आहे आणि ते ही अवघ्या तीन तासात.
मुंबई सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची गुरुवारी यशस्वी चाचणी पार पडली. १० फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे.
पंतप्रधान सोलापूरवरुन मुंबई जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काल या रेल्वे गाडीची चाचणी पार पडली आहे. ताशी 130 किलोमीटर वेगाने ही गाडी धावणार आहे.
दि.१० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान ताशी 130 किमी वेगाने धावणार आहे. ती पुण्यातून जाणार असल्याने पुणेकरांना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रवास अनुभवता येणार आहे.
सकाळी 6.50 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सुटेल आणि पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता ही ट्रेन पुन्हा मुंबईहून निघेल,
सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल आणि रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. तसेच एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज