टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कनिष्ठ विभागातील १५ ते १८ वयोगटातील ५७१ विद्यार्थ्यांना कोवीड १९ प्रतिबंधात्मक पहिली लस देण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या सौजन्याने आयोजित केलेल्या लसिकरण मोहिमेचे उदघाटन समन्वयक राहुल शहा,अरुणाताई माळी, किसन गवळी,अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कौंडुभैरी,मुरलीधर दत्तू ,बजरंग ताड,प्रशांत यादव, राहुल ताड,
बबलु सुतार,प्राचार्य डॉ एन बी पवार आदींच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थी हा केंद्रबिंदु आहे.
कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तसेच १२ वी बोर्ड परीक्षा लक्षात घेता तब्बल ५७१ विद्यार्थ्यांना कोव्हॅकसीनची लस देऊन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.
गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचेही लवकरच लसीकरण
तसेच काही कारणास्तव गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचेही लवकरच लसीकरण करून घेण्यात येणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना २८ दिवसानंतर दुसरी लस
त्याचबरोबर सदर लसीकरण मोहिमेत लस घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना २८ दिवसानंतर पुन्हा महाविद्यालयातच दुसरी लस देण्यात येणार आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर डॉ बालाजी बचुटे डॉ सिद्धराया बिराजदार कांचन करे प्रदिप भोसले जयसिंग हेंबाडे दत्ता ढेकळे गुरूदेव चौगुले विजय बागल प्रल्हाद नाशिककर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा धनाजी गवळी,यांचेसह कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज