टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, रहाटेवाडी, सलगर खुर्द, लक्ष्मीदहिवडी, अकोला, जित्ती या ६ गावामधून सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारोळे यांनी दिली आहे.
दि.५ फेब्रुवारी रोजी या रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द झाली असून दि.१० रोजी अर्ज स्विकारण्यास सुरुवात होणार असून दि.२४ रोजी अर्ज घेण्याची शेवटची तारिख, दि. ५ मार्च रोजी अर्जाची छाणणी करुन उमेदवाराची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशीत करणे,
दि.१९ मार्च रोजी प्रकाशीत केलेल्या यादीवर आक्षेप नोंदविणे, दि.२५ मार्च रोजी अंतिम निवड यादी प्रकाशीत करणे.
उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण, अर्जासोबत गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडने आवश्यक, पदवी व पदव्युत्तर, डी.एड., बी.एड.एम.एस.सी. आयटी इत्यादी शैक्षणिक कागदपत्राच्या आधाराव गुण देण्यात येणार असल्याने सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असणे बंधनकारक आहे. जातीचे प्रमाणपत्र, अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती, इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग आदींनी सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
वयाची अट २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्जदाराचे किमान १८ वर्षे पुर्ण असावे व ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे, विधवा उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ४० वर्षे अशी राहिल.
यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला आवश्यक आहे. लहान कुटूंबाची अट लागू असून यासाठी उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत अशी नियमाची अट आहे.
येथे करा अर्ज
पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे आणून दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज