टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगांव येथील व हल्ली सांगोला येथे वास्तव्यास असलेल्या उत्तम श्रीरंग गायकवाड (वय ४१) याने २९ मार्च रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.२० च्या दरम्यान शिरसी ते लेंडवे चिंचाळे जाणाऱ्या रोडवर शिरसीपासून दीड कि.मी.अंतरावर कोणत्या तरी अज्ञात कारणाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की,उत्तम गायकवाड याने सदर ठिकाणी बाभळीच्या झाडाखाली कोणत्या तरी अज्ञात कारणाने दारूच्या नशेत औषध पिल्याने तो मयत झाला अशी खबर त्याचा साडू बाबासाहेब अंबादास बाबर यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास पो.ना.येलपले हे करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणातून चार जणांना मारहाण
निवडणुकीच्या कारणातून मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे दोघांना तलवार , लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
गणेश युवराज माळी ( वय -३४ ) व नितीन युवराज माळी ( वय -३१ , दोघे रा.मल्लेवाडी ता.मंगळवेढा ) अशी जखमींची नावे आहेत.नितीन हे मंगळवारी दुपारी १२ वाजता घरासमोर थांबले होते.
त्यावेळी सुनिल ज्ञानू माळी व इतर सहा जण तेथे आले.त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन दोघांना तलवार , लोखंडी रॉडने व काठ्यांनी मारहाण केली.
यात गणेश यांच्या डोक्याला मार लागला आहे.तर नितीनच्या नाकास आणि डावे हातास मुक्कामार लागला आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












