टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयात मिळत नसलेले बेड लक्षात घेऊन, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी साखर कारखान्यावर 50 बेडचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी भरतीबाबत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात पांडुरंग कारखान्याचे प्रमुख माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोना आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.
यामध्ये सुधाकरपंत परिचारक हे कोरोनावर मात करू शकले नाहीत, मात्र इतर सदस्य कोरोनावर मात करून पुन्हा जनसामान्यात सेवेसाठी उपलब्ध झाले. परंतु सध्या कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयात बेड मिळत नाहीत.
रुग्णांची होत असलेली आर्थिक लुबाडणूक लक्षात घेता साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी एक धाडसी पाऊल टाकत तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युटोपियन कारखान्याच्या कार्यस्थळावर 50 बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या अनुषंगाने या सेंटरमध्ये आवश्यक असलेल्या वैद्यकीय कर्मचायांच्या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
साखर आयुक्तांनी प्रत्येक साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कोव्हिड सेंटर सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. परंतु या सूचनेची अंमलबजावणी जिल्ह्यात पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न या साखर कारखान्याने केला.
मंगळवेढा तालुक्यात चार साखर कारखाने असताना सर्वप्रथम त्यासंदर्भातील हालचाली अधिक गतिमान केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांबरोबरच कारखान्यातील कामगार व ऊसतोड मजुरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय सुविधा कारखान्यावर देण्यासाठी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह ठरणारा आहे.
स्व.सुधाकरपंत परिचारक हे परिचारक गटामध्ये कुटुंबप्रमुख म्हणून ओळखले जात होते. परंतु त्यांच्या जाण्याने परिचारक गटामध्ये जी पोकळी निर्माण झाल , ती भरून काढताना परिचारक गटासाठी आता कुटुंब प्रमुख होऊन त्याची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक व कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
Utopian Sugar to build 50-bed coveted center; Umesh Paricharak’s decision
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज