टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने नागरिकांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. तज्ञ युरोलॉजिस्टिक कडून मोफत तपासणी केली जाणार आहे.
आज शनिवार दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत न्यूरोलॉजिस्ट तज्ञ डॉ.स्वप्नील बोबडे हे मोफत तपासणी करणार आहेत.
मूत्रविकारांचे सर्वोत्तम उपचार आता सर्वांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने लघवी संदर्भात मोफत शिबिराचे आयोजन केले आहे.
युरोप्लोमेट्री नावाचे उपकरण संगणकाद्वारे आपल्या लघवीचा प्रेशर तपासते त्यामधून आपल्याला प्रोस्टेटचे म्हणजे पुरुष ग्रंथीची वाढ किंवा आजार झाल्याची कळते, ही तपासणी प्रत्येकाची मोफत केली जाणार आहे.
खालील ‘ही’ लक्षणे असल्यास आजच डॉक्टरांना भेटा
मुतखडा (किडनी स्टोन), प्रोस्टेट संबंधी आजार, सतत लघवी लागणे, ओटीपोटात दुखणे, लघवीची धार कमी होणे, लघवीसाठी जोर करावा लागणे, लघवी वाटे रक्त जाणे, मूत्र मार्गात जंतुसंसर्ग,
लहान मुलांमधील मूत्रविकार, स्त्रिया मधील मूत्रविकार आदी लक्षणे असल्यास आजच मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क साधावा.
दरम्यान, तरुण वयोवृद्ध यामध्ये कोणालाही हा त्रास असू शकतो त्यामुळे न लाजता, न दुर्लक्ष करता त्वरित आपण या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उपचाराची आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया
तसेच याबाबतच्या आजारांसाठी पुढील उपचाराची आवश्यकता भासल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने आयुष्मान भारत योजना अंतर्गत मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज