टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका हा आतापर्यंतचा दुर्लक्षित कर्मचारी वर्ग होता. मिळणारे तुटपुंजे वेतन, कामाचा ताण, कमी भत्ता अशा अनेक कारणांमुळे अंगणवाडी सेविका त्रस्त होत्या.
पण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यावेळेस उपस्थितीत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाखो महिला आणि बाळांचे सेवक झालेत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाद्वारे 3 कोटी 50 लाख महिला याद्वारे जोडल्या गेल्या आहेत. या महिलाच्या खात्यात १४ हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
या महिलांपर्यंत पोहचणाऱ्या आशा वर्कर्सचे त्यांनी आभार मानले. पोर्टल हे निमित्त आहे. मात्र आई नसताना, बहिण नसताना, नर्स नसताना ही त्या महिलींच्या घरी जाऊन त्याची नोंद ठेवतात, याचे त्यांनी कौतुक केले. या महिला शक्ती असून त्यांना पैशाच्या तराजून मोजता येणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आदीवासी विभागामध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचे काम सुरु असणे हे खरचं अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
अंगणवाडीच्या हेल्पर म्हणून काम करणाऱ्या 3 हजार सुशिक्षित महिलांना तात्काळ प्रमोशन दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच त्यांना 11 हजार 800 रुपये प्रत्येक नव्या फोनसाठी पाठवले जातील. यातून सर्वांना नवे फोन दिले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
अंगणवाडी महिलांना विमा सुरक्षा दिली जाणार असून या विम्याचे पैसे सरकार भरणार असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. महिला सशक्ती करणाबाबत आदीती तटकरे व मंगलप्रभात लोढा यांनी एकत्रित बसून काय करता येईल ते सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
यासोबतच राज्यात 1 हजार पाळणाघर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निर्भया फंडसाठी कुठलीही कमतरता राहणार नसून केंद्राकडून सर्व सहकार्य केलं जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अंगणवाडी भाऊबीज पैसे मिळाले का ? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. त्यावेळेस महिलांनी पैसे मिळाले नाही, असे एकसुरात सांगितले. दिवाळी आधी तुम्हाला पैसे मिळतील. फाईलवर सही झाली आहे, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबत मोबाईल देखील तुम्हाला मिळतील. आशा वर्करस यांनाही मानधन वाढ करु अशी घोषणाही त्यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज