mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धैर्यशील मोहिते पाटील समजून घेताना! मोहिते पाटलांच्या तुतारीचा जोर वाढला; आज हजारो युवक त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगधंद्याच्या माध्यमातून संसार सुखाने चालताना दिसत आहेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 5, 2024
in सोलापूर
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि आपले हात नेहमी रिकामे ठेवून अनेकांचे संसार फुलवणारे दयावान म्हणून परिचित असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी मधून माढा लोकसभा मतदारसंघात उभे आहेत त्यांच्या उमेदवारीला सर्व मतदार संघातून अद्वितीय प्रतिसाद मिळत असताना विरोधक मात्र खालच्या केलेले पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत.

यावरूनच विरोधकांनी हात टेकलेले दिसत आहेत. विरोधक करत असलेल्या टीकेवरून जनता जनार्दन अधिकच संताप व्यक्त करताना दिसत असून याचा परिणाम म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना अधिकच प्रतिसाद वाढताना दिसतो आहे.

चार आमदार, एक पालकमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांची सभा इतकी मोठी फौज आणि ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात लावून सुद्धा जनमताच्या रेट्यापुढे महायुतीचे उमेदवार कमजोर झालेले दिसत आहेत आणि यातूनच ते वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत.

विकासाचे मुद्दे राहिले बाजूला पण महायुतीची मंडळी वैयक्तिक मोहिते पाटलांचे गुन्हे व इतर काही गोष्टी काढून मतदारांत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत. मोहिते पाटील समजायला सुजाण नागरिक व्हावं लागतं असा टोला या निमित्ताने जनता लगावताना दिसत आहे.

अगदी सहकार महर्षीच्या काळापासून ते सर्व आजपर्यंत मोहिते पाटील परिवाराने जो कार्याचा अवस्थेत आलेख उंचावत ठेवला आहे सर्वसामान्यांचे अश्रू नैराश्यातून त्यांनी पुसण्याचे काम आजपर्यंत आहे.

जनतेबरोबर मोहिते पाटलांचे ऋणानुबंध इतके घट्ट झाले आहेत की ते अशा बिनबुडाच्या आरोपाने सैल होतील असे कदापिही घडणार नाही. याउलट मोहिते पाटील यांना कोणी बोलली की याचा फायदा मोहिते पाटलांना जास्त होतो असाही आजपर्यंत राजकीय इतिहास आहे.

फक्त माढा लोकसभा मतदारसंघातच नाही तर शेजारील सोलापूर, बारामती अशा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील चाळीस-पन्नास वर्षाच्या राजकारण समाजकारणात मोहिते पाटलांनी जी माणसे कमवली आहेत ती अशा विरोधकांच्या टीकेने कमी होणारी नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

सहकार महर्षी नंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी जे कार्याचे जाळे निर्माण केले आहे ते लोकांना भावले आहे आणि त्यानंतरच्या काळात रणजीतसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या बंधूनी ही परंपरा जपून जनमानसात जाऊन ही करायची परंपरा जपली आहे. त्यामुळेच लोक मोहिते पाटलांवर फिदा आहेत.

आता धैर्यशील मोहिते पाटील हे माढाच्या रणांगणात महाविकास आघाडी करून उभे असताना स्तरातून त्यांना पाठिंबा दिसतो आहे. अशा विरोधक मंडळी मात्र हताश आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करताना दिसत आहेत.

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, स्वतः उमेदवार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अन्य काही मंडळी मोहिते पाटलांचा समाचार घेताना दिसत आहेत. मोहिते पाटील उभे राहण्यापूर्वी हीच मंडळी मोहिते पाटील आमचे आहेत असे म्हणत होती आता मात्र खालच्या पातळीवर जाऊन बोलताना दिसत आहेत.

धैर्यशील मोहिते पाटील हे एक वेगळे रसायन आहे आजपर्यंत त्यांनी कार्यकत्यांना, जनमताला सर्वस्व मानले. आज हजारो युवक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून संसार सुखाने चालताना दिसत आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी तरुणाईला संधी दिली आहे त्याची उदाहरणे ताजी आहेत. शिक्षण कला सामाजिक क्षेत्रात त्याचे अनमोल योगदान आहे.

पण हे सर्व कार्य विरोधकांना कसे दिसणार हा खरा सवाल आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे व्यक्तिमत्व समजून घ्यायला हवे. त्यांच्या मनात असणाऱ्या संकल्पना, देशाविषयी असणाऱ्या तेजोमय भावना व लोक विकासाच्या योजना यामुळे हे व्यक्तिमत्व संसदेत जावे ही जनमताची भावना आहे.

त्यामुळे काहीतरी काढून टीका टिप्पणी करता येते मात्र व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला मनाची तयारी असावी लागते ती विरोधकांकडे दिसत नाही त्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटलांच्या तुतारीचा जोर मतदार संघात वाढताना दिसतो आहे.

आ.शहाजीबापूंच्या टिकेला फुल म्हणून स्वीकारले..

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सध्या मोहिते पाटलावर घसरताना दिसत आहेत मात्र या टीकेवर सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या तोंडात नेहमी सरस्वती असते असे म्हणत त्यांच्या टिकेचा मी फुल म्हणून स्वीकार करतो असे उत्तर दिले. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील समजून घेताना त्यांच्यातील असणाऱ्या गुणतत्वांचा अभ्यास करायला हवा. टीका करणाऱ्यांनी एवढे ध्यानात घेतले पाहिजे की ते जितकी टीका करतील तितकेच धैर्यशील मोहिते पाटलांचे नेतृत्व तेजोमय होत राहणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धैर्यशील मोहिते पाटील

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
Next Post
सोलापूरकरांनो! वडिलांनी 40 वर्षांत सोलापुरासाठी काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार? प्राणिती शिंदे यांना सवाल

सोलापूरकरांनो! वडिलांनी 40 वर्षांत सोलापुरासाठी काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार? प्राणिती शिंदे यांना सवाल

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

March 31, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा