मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर-तामदर्डी शिवारात गंभीर गुन्हयातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलिसांना घातक शस्त्रे व पांढऱ्या रंगाचे दागिने व दोन मोटर सायकली मिळून आल्या आहेत.
या प्रकरणी नागेश भोसले , छन्या भोसले ( रा . तामदर्डी ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी दत्तात्रय पाटील, पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यासह ४० ते ५० पुरुष पोलिस व महिला पोलिस कर्मचारी असा फौजफाटा तांडोर-तामदर्डी दि . २८ रोजी कोंबींग ऑपरेशन करत असताना नुरंद कवचाळे यांचे ऊस तुटून गेलेल्या शेतात पालामध्ये आरोपी नागेश मधूकर भोसले, छन्या भिमशा भोसले पोलिस आल्याची चाहूल लागताच ऊसाच्या फडात आश्रयास पळून गेले.
दरम्यान,आरोपी ज्या ठिकाणी दोघे झोपले होते त्या ठिकाणी पोलिसांनी त्या पालात प्रत्यक्ष पाहणी केली असता अंथरूणाखाली भाले ,लोखंडी दांडपट्टे, घातक शस्त्रे, पायातील पैंजण , कमरेचा छल्ला, चेसी नंबर खोडलेली काळया रंगाची मोटर सायकल, २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटर सायकल आदी साहित्य मिळून आले.
याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज