टीम मंगळवेढा टाईम्स ।
लग्नानंतर विवाहिता बेपत्ता झाल्याच्या दोन घटना करमाळा तालुक्यातील चिखलठाण नं.१ व मांजरगाव येथे घडल्या आहेत.
यामध्ये एक मुलगी लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी पळून गेली, तर दुसरी मुलगी लग्नानंतर नऊ दिवसांनंतर पळून गेली.
करमाळा तालुक्यातील मांजरगाव व चिखलठाण क्र.१ या गावातील दोन तरुणांचे लग्न झाले होते. त्या दोन्ही परिवाराची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये तेच एजंट असल्याची माहिती पुढे आली आहे. सरुवातीला मांजरगाव व चिखलठाण क्र १ येथील परिवाराने सुरसवडी (ता.इंदापूर) येथील एका पुरुष एजंटकडे लग्नासाठी मुलीची मागणी केली होती.
या एजंटाने परभणी येथील एका महिला एजंटामार्फत दोन लग्न लावून दिले होते. मांजरगाव येथील तरुणाचे लग्न केलेली मुलगी लग्न झाल्या दिवशीच येताना तुळजापूर मंदिरातून प्रसार झाली.
तर चिकलठाण येथील तरुणाशी लग्न झालेली मुलगी लग्नाच्या नवव्या दिवशी रात्री १२.३० सुमारास पळून गेली. या दोन्ही कुटुंबांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मांजरगाव येथील कुटुंबाने तुळजापूर येथे गुन्हा दाखल केला, तर चिखलठाण येथील कुटुंबाने करमाळा गोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवला आहे.(स्रोत; लोकमत)
कागदपत्रेही खोटी
लग्न जमवण्याआधी मुलींचे दिलेले आधार कार्ड , शाळेचा दाखला ही कागदपत्रे नातेवाइकांनी तपासली असता ती खोटी असल्याचे सिद्ध झाले. करमाळा पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून परभणीच्या एजंटला फोन केला तेव्हा ती मुलगी इकडे आली नाही,
नवरा मुलगा आमचे फोन उचलत नाही , त्यामुळे मुलीला भीती वाटल्याने ती निघून आली असल्याचे कारण दिले. दसऱ्याच्या नंतर मी मुलीला घेऊन येतो, असे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज