टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सण २०२२-२३ चा राज्यस्तरीय शैक्षणिक व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल
राज्यस्तरीय आदर्श माध्यमिक शाळा पुरस्कार मंगळवेढा येथील आश्रम शाळा पडोळकरवाडी या प्रशालेस प्राप्त झाला.
सन्मानपत्र व मानचिन्ह राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ, माजी महापौर अरुणाताई वाकसे , ह.दे. प्रशालेचे प्राचार्य मोतीबंण्णे, तसेच मंगळवेढा तालुकाप्रमुख सुभाष गायकवाड, राजेंद्र माळी तसेच माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य राजेंद्र पोतदार, पर्यवेक्षक उत्तम कलुबर्मे ,
प्राथ.मुख्याध्यापक सुनील साळे व प्राथ व माध्यमिक चे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रशालेस पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, संस्थेचे उपाध्यक्ष महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, सचिव सिद्राम जावीर तसेच संस्थेच्या प्रशासन अधिकारी क्रांतीताई आवळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज