मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील एका वाहन चालकाने थेट पोलिसाच्या अंगावरच गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वाहन थांबवण्याचा इशारा केल्यानंतर मोटार सायकलस्वाराने न थांबता थेट वाहतूक शाखा प्रमुखांच्या अंगावरच मोटार सायकल घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मल्हारी रमेश सकट (रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या इसमाविरुध्द शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर शहरातील चौफळा चौकामध्ये कृष्णाचे मंदिराजवळ मल्हारी रमेश सकट हा (एम.एच. 13 ए.ई.290) मोटार सायकलवरू येत होता. त्यावेळी वाहतूक शाखेचे प्रमुख गणेश निंबाळकर यांनी मल्हारी सकट याला मोटार सायकल थांबवण्याचा इशारा केला.
परंतु सकट याने न थांबता मोटारसायकल निंबाळकर यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मल्हारी सकट हा लोकांच्या गर्दीत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्यानंतर त्याला पोलीस अंकुश रामचंद्र वाघमारे यांनी थांबवत होते. परंतु त्याने वाघमारे यांच्या छातीवर जोरात मारुन ढकलून देऊन जखमी केले. वाघमारे यांना कायदेशीर कर्त्यव्य करण्यास अडथळा केला.
दरम्यान, याप्रकरणी मल्हारी सकट याच्याविरुध्द भा.द.वि.क. 353, 332, 289, सह मोटार वाहन कायदा कलम 132/179, 236(1), /177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज