
बारामती । भरधाव वेगातील टेंपो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवकांचा रविवारी (ता.६) संध्याकाळी जागीच मृत्यू झाला. बारामती-इंदापूर राज्य मार्गावर भवानीनगर नजिक हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची अद्याप ओळख पटलेली नसून उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह बारामतीला आणले जाणार आहेत.
नातेपुते येथील दोन युवक दुचाकीवरुन रविवारी उरुळी-कांचनकडे निघाले होते.
त्याच वेळेस एक टेंपो बारामतीहून इंदापूरकडे निघाला होता. भवानीनगर नजिक नीरा डावा कालव्याच्या पूलाच्या अलिकडील बाजूस समोरासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सदर ट्रकचालक फरारी झाला आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. याच ठिकाणी या पूर्वीही एक अपघात झालेला होता.
Tempo blew up two-wheeler on Baramati-Indapur state highway; Two youths killed on the spot



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











