टीम मंगळवेढा टाईम्स । कंटेन्मेंट झोनमध्ये दोन हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १५ ते २० मिनिटात कोरोनाचे निदान होणार आहे. या माध्यमातून ज्या व्यक्तींना कोरोना झाला आहे मात्र लक्षणे दिसली नाहीत , अशांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची भीती व्यक्त करत तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी शनिवारी मंगळवेढा तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
या बैठकीला गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ स्वामी उपस्थित होते.
तहसीलदार रावडे म्हणाले,शहर व ग्रामीण भागात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील समाधानकारक आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी विशिष्ट पथके तयार करावीत, गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी आपसातील समन्वयासाठी बैठका घ्याव्यात.
सर्वेक्षणाचे काम व्यवस्थित होत आहे की नाही,याची फेरतपासणी करावी, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या.
Two thousand rapid antigen tests will be done on Tuesday: Tehsildar Swapnil Rawade
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज