मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुणे येथे नोकरीनिमित्त गेलेेले दोन नागरिक गुुरुवारी मंगळवेढा येथे परतले.त्या दोघांना सर्दी,खोकला,ताप येत असल्याने स्वतःहून ते सकाळी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात हजर झाले.
दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यंाची सी.बी.सी. तपासणी करून औषधोपचार करून एकाला पुढील उपचारासाठी सोलापूरला तर अन्य एकाला घरी पाठविल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातील दोन इसम तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त रहात होते.गुरुवारी पहाटे ते मंगळवेढयाला येण्यास निघाले असता त्या दोघांना थंडी,ताप,सर्दी,खोकला व अन्य एकाला छातीत दुखण्याचा त्रास होवू लागल्याने ते घरी न जाता थेट मंगळवेढयाच्या ग्रामीण रुग्णालयात स्वतः दाखल झाले.केस पेपर नोंदविल्यानंतर त्यांची सी.बी.सी. तपासणी करण्यात आली. ही नॉर्मल असल्याचे सांगितले.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाल्याने याची त्या दोघांनी धास्ती घेतल्याने ते पुर्णतः घाबरले असल्याचे उपचार करणार्या वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात अधिक चाचण्या करण्यासाठी सुविधा नसल्याने त्या दोघांपैेकी एकाला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाचा केसपेपर देण्यात आला आहे.दुसर्या रुग्णालाही पुढील केसपेपर देण्यात आला आहे.लक्षणे वाढल्यास पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्याच्या सुचना केल्या असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाची ओ.पी.डी.जवळपास सरासरी 300 रुग्णांची असून सोमवारी बाजारदिवशी जवळपास हा आकडा 500 च्या वर पोहोचत आहे.सध्या उष्णता वाढत असल्याने तापाचे रुग्णाही वाढत आहेत.गुरुवारच्या तपासणीत जवळपास 10 तापाचे रुग्ण आढळून आले आहेत.
ताप रुग्णाच्या अंगात मुरल्यामुळे टॉयफाईडचे प्रमाणही वाढत असून तीन रुग्ण तपासणीत टॉयफाईडचे आढळले आहेत.शहरातील खाजगी रुग्णालयात तापाचे मोठया प्रमाणात रुग्ण उपचार घेत असून मिळेल त्या जागेत तेथील डॉक्टर दरवाजाच्या कडी कोयंडयाला,खिडक्यांच्या हुकाला सलाईन अडकावून रुग्णांना ती लावत असल्याचे चित्र आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
जाहिरात
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज