मंगळवेढा टाईम्स न्युज।
मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथून नजीक पिंपरी मार्गे मोहोळ येथे कॉलेजला इलेक्ट्रिक दुचाकीवरुन निघालेल्या दोघींना टेम्पोची धडक बसली. या अपघातात एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय वर्षे १७ तांबोळे, ता. मोहोळ) व स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १७, रा. नजिक पिंपरी, ता. मोहोळ) असे अपघातात मरण पावलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत.

शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ७.४० च्या दरम्यान नजीक पिंपरीजवळ हा अपघात घडला. प्रज्ञा हिचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान स्नेहल मरण पावली.

तांबोळे येथून इलेक्ट्रिक मोटारसायकल (एम. एच. १३ ई. एन. ७०९५) या वरून प्रज्ञा कोकाटे ही मोहोळ येथे महाविद्यालयाकडे निघाली होती.

दरम्यान नजीक पिंपरी येथे कन्या प्रशालेच्या कॉलेजला निघालेली मैत्रिण स्नेहल वाघमोडे ही रस्त्यावर तिची वाट पाहात थांबली होती. त्या दोघी मोहोळच्या दिशेने येत असताना

जाकीर हुसेन सौदागर यांच्या शेताजवळ मोहोळहून कुरुलकडे जाणाऱ्या टेम्पो (एम. एच. १३/ ई.पी. ००१९) ने समोरून इलेक्ट्रिक मोटारसायकलला धडक दिली.

या अपघातात प्रज्ञा हिचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेली स्नेहल वाघमोडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












