टीम मंगळवेढा टाईम्स । परजिल्हा व राज्यात जाण्यासाठी नागरिकांना ई-पाससाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून दिल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक झाली आहे. गुरुनानक चौकातील शुभम ई सेवा ऑनलाइन केंद्राचे शुभम विजयकुमार एकबोटे (२४) , राहुल विजयकुमार एकबोटे ( वय २८ ) यांना अटक झाली.
उमेजा हॉस्पिटलचे डॉ.अफ्रीन कलबुगी (रा.आसरा चौक) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शुभम व राहुल या दोघांनी मिळून परजिल्हा व परराज्य येथे जाण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून देत होते. त्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र लागते. डॉ.कलबुर्गी यांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देत होते. म्हणजेच कोविड १९ हा आजार नाही म्हणून हे प्रमाणपत्र संगणकावर तयार करून प्रिंट देत होते.
याबाबतची माहिती सायबर सेल पोलिस स्टेशनला मिळाली होती. याची सत्यता पडताळणी केली असता हे प्रकरण समोर आले,सायबर सेलचे निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले , शुभम व राहुल हे नागरिकांना ई पास काढताना बनावट प्रमाणपत्र तयार करून देत होते.
डॉ.कलबुर्गी यांनी एका व्यक्तीला प्रमाणपत्र दिले होते. त्याच प्रमाणपत्रावर पुन्हा तांत्रिक पद्धतीने खाडाखोड करून दुसऱ्याचे नाव टाकून कलर प्रिंट काढत. यासाठी नागरिकांकडून पैसे घेत. तपासात ही बाब समोर आल्यानंतर कारवाई झाली.
Two arrested for giving fake certificates for e-pass in Solapur
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज