ADVERTISEMENT
mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने; असा आहे विश्वचषकाचा आजवरचा इतिहास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2021
in राष्ट्रीय
टी-20 वर्ल्डकपचा थरार आजपासून; पहिल्याच दिवशी दोन लढतींची रंगत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील टश्शन क्रिकेट सामन्यात चांगलीच दिसून येते. दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत नसल्याने द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाहीय.

परंतु आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांविरुद्ध खेळतात. यूएईमध्ये आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे.

आज रविवारी भारत आणि पाकिस्तानदरम्यान दोन्ही संघांचा पहिला सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत शंभर टक्के निर्भेळ यश मिळविले आहे. भारतीय संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे.

तसेच विश्वचषकाचा दावेदारीही समजला जात आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात भारताने पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा भारतालाच ‘मौका’ मिळणार का याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला लागली आहे.

२००७ विश्वचषक

या स्पर्धेत भारताने प्रथम फलंदाजी करत ९ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ७ गडी गमावून तितक्याच धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्याने हा सामना बॉल आउटमध्ये पोहोचला.

भारताने हा सामना जिंकून टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय मिळविला. त्यानंतर दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा समोरासमोर आले. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ गडी गमावून १५७ धावा बनवल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला. भारताने प्रथमच टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकून इतिहास रचला.

२०१२ विश्वचषक

भारत आणि पाकिस्तानचे संघ थेट २०१२ च्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले. भारताने प्रथम शानदार गोलंदाजी करून पाकिस्तानला १२८ धावांवर रोखले. त्यानंतर दमदार फलंदाजी करून १७ व्या षटकात २ गडी गमावून विजय निश्चित केला.

२०१४ विश्वचषक

भारत आणि पाकिस्तानचा सामना २०१४ मध्ये पुन्हा एकदा झाला. यात भारताने विजयी परंपरा कायम राखली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ ७ गडी गमावून १३० धावा करू शकला. भारताने तीन गडी गमावून १८.३ षटकात दिलेले आव्हान अगदी सहज पार केले.

२०१६ विश्वचषक

या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करताना अडखळले. पाकिस्तानी संघाने ५ गडी गमावून ११८ धावा करू शकला. भारताने हे लक्ष्य १५.५ षटकात ४ गडी गमावून सहज पार केले आणि विजयीरथ कायम ठेवला.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: क्रिकेट
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

आत्मपरीक्षण! काँग्रेसच्या पराभवासाठी ‘ही’ गोष्ट कारणीभूत? 2024 च्या निवडणुकीआधी वाजली धोक्याची घंटा

December 4, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

कौतुकास्पद! सोलापूरच्या अर्शिनची भारतीय संघात निवड; दुबईमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपसाठी खेळणार; जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला

November 26, 2023
मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनो! बारावीत ‘जीवशास्त्र’ नसेल, तरीही होता येईल डॉक्टर; इच्छुकांसाठी ऐनवेळी अतिरिक्त परीक्षेचा पर्याय

November 25, 2023
दुबईत महाराष्ट्राचा दबदबा! दुबईतील क्रिकेट स्पर्धेत राॅयल मराठा संघाचा दणदणीत विजय

दुबईत महाराष्ट्राचा दबदबा! दुबईतील क्रिकेट स्पर्धेत राॅयल मराठा संघाचा दणदणीत विजय

November 24, 2023
नवे संकट! घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवी डोकेदुखी, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे आवाहन

धाकधूक वाढवली! चीननं पुन्हा कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक; WHO नं मागितला अहवाल

November 24, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून टी 20 चा रनसंग्राम; टी-20 मालिकेचे वेळापत्रक कसे आहे? सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

November 23, 2023
10 टीम आणि 1 ट्रॉफी! आजपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात; सामने टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर दिसणार? टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

भारताचं स्वप्न भंगलं! ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता; इंडियाचा लाजिरवाणा पराभव

November 19, 2023
कौतुकास्पद! जर्मनीच्या जागतिक कृषी प्रदर्शनात स्क्रिनवर झळकले मंगळवेढ्यातील शेतकरी जोडपे; भारतीय शेतकरी म्हणून निवड

कौतुकास्पद! जर्मनीच्या जागतिक कृषी प्रदर्शनात स्क्रिनवर झळकले मंगळवेढ्यातील शेतकरी जोडपे; भारतीय शेतकरी म्हणून निवड

November 17, 2023
दीपावलीत लक्ष्मीपूजन कसे करावे?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

धन-धान्याची बरकत! दिवाळीत लक्ष्मी पूजनाची सर्वोत्तम वेळ, महत्त्व, घर, ऑफिसमधील पूजेचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या…

November 12, 2023
Next Post
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

चोरीच्या उद्देशाने संशयीतरित्या रात्री फिरणार्‍या एकास मंगळवेढा पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

December 8, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

December 8, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

December 8, 2023
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच; ‘या’ रुग्णांचा देखील समावेश, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

December 8, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा