टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदावरुन त्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षात तुकाराम मुंढे यांची १५ वेळा बदली झाली आहे. Tukaram Mundhe has made 15 transfers in the last 15 years
तुकाराम मुंढे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत झालेल्या बदल्या
1. सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)
2. नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)
3. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी 2008 ते मार्च 2009)
4. नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)
5. वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै 2009 ते मे 2010)
6. मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जून 2010 ते जून 2011)
7. जालन्याचे जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)
8. मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)
9. सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)
10. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)
11. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)
12. नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)
13. नियोजन विभाग, मंत्रालयात सहसचिव ( नोव्हेंबर 2018 ते डिसेंबर 2019)
14. एडस नियंत्रण प्रकल्प संचालक (डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020)
15. नागपूर महापालिका आयुक्त (जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2020)
Tukaram Mundhe has made 15 transfers in the last 15 years
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज