टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘तुझे बच्चे नही होते, इसके पाँव तोडके के तालाब में डालो’ अशी धमकी देत, शारीरिक व मानसिक छळ करून माहेरहून दहा लाख रुपयांच्या हुंड्याची सासरच्या लोकांनी मागणी केल्याची तक्रार
आलिशा फारुक वालीकर (वय २८, रा.ओम नमः शिवायनगर, होटगी रोड, सोलापूर) या विवाहितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात ३१ डिसेंबर रोजी दिली आहे. हा छळ ३ सप्टेंबर, २०१५ ते १ नोव्हेंबर, २०२३ या काळात केल्याचे म्हटले आहे.
फारुक वालीकर (पती), बाशासाब वालीकर (सासरा), हसिना वालीकर (सासू), सादिक वालीकर (दीर) (सर्व रा. ओम नमः शिवायनगर, होटगी रोड, सोलापूर), हिना उर्फ मालनबी शेख (नणंद), नबीलाल शेख (नणंदेचा पती) (दोघे रा.चडचण, ता. इंडी, जि. विजापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचा ओम नमः शिवायनगरातील फारुक वालीकर याच्याशी लग्न झालेले आहे. लग्नानंतर काही दिवसांनी म्हणजे सप्टेंबर, २०१५ पासून हुंड्यासाठी, तसेच मूल होत नाही, म्हणून सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. पुढे तो वाढतच गेला.
सासरा ‘तुझे बच्चे नहीं होते,’ असे म्हणून हिणवत होता. सासू-सासरे दोघे मिळून आलिशाच्या पतीस ‘ऐसे लडकी के साथ शादी क्यूं किया, तू घर छोड के जा,’ असे म्हणून
मुलाचीही पदोपदी मानहानी करून त्रास देत होते, पतीच्या पश्चात सासू-सासऱ्यांनी केलेली मारहाण, छळ पतीस सांगितला, तर ते पुन्हा मारहाण करीत होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज