टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विद्या विकास मंडळ,श्री संत दामाजी महाविद्यालयाचे संस्थापक स्व रतनचंद शहा (शेठजी) यांचा १५ वा पुण्यस्मरणदिन साजरा करण्यात आला प्रथमतः स्व रतनचंद शहा (शेठजी) यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यकारणी सदस्य यादव आवळेकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शेठजींच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात चिंच,लिंब आदी प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच कोरोनाच्या महामारीमुळे सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याकारणाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे उदघाटन उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सौ सरजुबाई बजाज रक्तपेढीच्या सौजन्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी लतिफ तांबोळी यांनी शेठजींच्या अनेक आठवणी जागवून सर्वांनी श्रध्दांजली अर्पण केली.
सदर पुण्यतिथीनिमित्त राहुल शहा,डॉ आश्विनी शहा,प्रणव परिचारक,रामचंद्र जगताप,किसन गवळी,लक्ष्मण नागणे,भारत बेदरे,रामेश्वर मासाळ,दादा पवार,डि के दत्तू,बजरंग ताड,मुझ्झपर काझी,चंद्रशेखर कौंडुभैरी,भीमराव मोरे,विजय देशमाने,अशोक माने,
सागर शहा यांचेसह प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक प्रा.राजेंद्र गायकवाड,राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व प्रकल्प अधिकारी,वरीष्ठ, कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज