बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने गुरुवार ६ ऑगस्ट रोजी तालुक्यातील महुद गावात एकाच कुटुंबातील व पती-पत्नीसह तब्बल १० रुग्ण तर बलवडी येथे सहा असे एकूण १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे शहर व तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. तसेच तब्बल १०२ जणांवर उपचार सुरु असल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील महुद येथील १२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच सांगोला शहर व तालुक्यातील ५४१ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या होत्या यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. Treatment of 102 corona infections in Sangola
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज