टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलिस ठाण्यात गेली पाच वर्षे कार्यरत असलेल्या 11 पोलिस कर्मचार्यांच्या प्रशासकिय बदल्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केल्या असून तसा आदेश मंगळवेढा पोलिस प्रशासनास प्राप्त झाला आहे.
दरम्यान,मंगळवेढयाला नव्याने 12 पोलिस कर्मचारी नव्याने बदलून येणार आहेत.
आपला बिझनेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात पोहोचवा. (दैनंदिन 80 हजार वाचक)
आजच आपली जाहीरात बुक करा : 9970766262
सोलापूर ग्रामीण मधील ज्या पोलिस कर्मचार्यांनी एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षे सेवा बजावली आहे अशा कर्मचार्यांच्या नुकत्याच पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून सोयीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये कर्मचार्यांकडून तीन ठिकाणे मागविण्यात आली होती. त्यामधून सोयीचे ठिकाण देण्यात आले आहे.
मंगळवेढा येथून बदलून गेलेले कर्मचारी पोलिस हवालदार दत्तात्रय येलपले, वाहनचालक विक्रम वाघमारे, पोलिस नाईक चनगोंडा धानगोंडे, पोलिस शिपाई जमीर मुजावर, रफिक तांबोळी, रमेश सुर्यवंशी, सचिन दरदरे, विठ्ठल खांडेकर, बालाजी गायकवाड, महिला पोलिस शिपाई शोभाताई कदम, प्रियांका सुर्यवंशी आदी 11 जणांच्या बदल्या अन्यत्र झाल्या असून
बाहेरून मंगळवेढयाला येणारे कर्मचारी सहाय्यक फौजदार अमोगसिध्द वाघमोडे, वाहनचालक सैफन अन्सारी, पोलिस नाईक आप्पासो पवार, पोलिस शिपाई प्रविण जाधव, अजयसिंग शिंदे, महिपती कांबळे, सचिन वारंगुळे, अमीत वाघमारे, चालक युवराज वाघमारे, महिला पोलिस नाईक सुनिता चवरे, महिला पोलिस शिपाई जयश्री गायकवाड, ज्योती सात्वेकर आदी 12 कर्मचारी नव्याने मंगळवेढयात प्रशासकिय बदलीतून येत आहेत.
विनंती बदल्या अदयाप होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान,पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी कर्मचार्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
जे कर्मचारी कामात कुचराई करतात व ज्यांच्याबाबत तक्रारीचा सूर आहे अशा कर्मचार्यांना मात्र पोलिस मुख्यालयाचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज