टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे विजयकुमार येडसे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आय.पी.एस. अधिकारी अंजना क्रिष्णा व्ही.एस. यांनी छापा टाकून
रोख रक्कम, मोटर सायकली, मोबाईल, चारचाकी वाहने, असा ९ लाख ५० हजार रपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रदिप कांबळे (जत.), सिताराम बागल (मरवडे), परमानंद उर्फ करण कांबळे (जत), नवनाथ कांबळे (बेगमपूर),
सुरेश गोडसे (सिध्देवाडी), विजयकुमार येडसे (मरवडे), रवी बोरगीकर (जत), बसवराज कोळी (जत), महेश बिराजदार (इंड), सुभाष जाधव (चडचण), महादेव नाईक (जत),
दुंडेश दिवेकर (जत), सुधाकर लुती (जत), मंगेश (सिध्देवाडी), समीर (मरवडे), राजकुमार (चडचण), चंद्रकांत जाधव मुजावर बजयंत्री पवार (येड्राव), परमेश्वर कांबळे (जत) आदी १८ जणाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे मंगळवेढा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी आय.पी.एस. अधिकारी अंजना क्रिष्णा व्ही. एस. या हजर असताना गोपनीय माहिती मिळाली की, मरवडे येथे एका शेतात दोन जुगार अड्डे सुरु आहेत ही माहिती मिळताच संबंधीत अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील,
पोलीस उपनिरीक्षक विरसेन पाटील, पोलीस अंमलदार मिसाळ व स्वतः पोलीस अधिकारी अंजना क्रिष्णा व्ही.एस. या मरवडे येथे खाजगी वाहनाने हजर झाल्या. अलिकडेच वाहने उभा करुन जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
छाप्या प्रसंगी जाग्यावरच जुगार खेळणाऱ्या १८ आरोपींना पकडण्यात आले. दोन ठिकाणी गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सर्व आरोपींची अंगझडती घेण्यात आली.
त्या घटनेत मोटर सायकली, मोबाईल, रोख रक्कम, चारचाकी वाहने असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची फिर्याद पंढरपूर ग्रामीणचे पोलीस अंमलदार गणेश पाटील यांनी मंगळवेढा पोलीसात दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज