मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
चालानच्या मुद्द्यावरून अनेकदा वाहतूक पोलिस नागरिकांमधील व वाद टोकाला जातात. गोव्यामध्ये वाहतूक पोलिसाकडे बॉडी कॅमेरा नसेल तर चालानची कारवाईच करता येत नाही.

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांनादेखील बॉडी कॅमेरे देण्यात येण्याबाबत विचार सुरू आहे.

अगोदर राज्यातील प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने याला लागू करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेत सुनील शिंदे यांनी वाहतूक पोलिसांकडून ई-चालानसाठी खासगी मोबाइल फोनचा वापर करण्यात येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

त्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही बाब मांडली. जर कुणी वाहतूक कर्मचारी असा प्रकार करत असेल तर तो चुकीचा आहे, असे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.

अभ्यास समिती गठित करण्यात येईल
अनेकदा वाहनचालकांना चालानचे एसएमएस उशिरा जातात. हीच बाब लक्षात घेऊन प्रणाली अपग्रेड करण्यात येत आहे.

राज्यात जुन्या चालानची मोठ्या प्रमाणावर वसुली बाकी आहे. काही लोक वारंवार कारवाई होऊनदेखील चालान भरत नाहीत.

अगदी परवानादेखील निलंबित झाला तरी लोकांना त्याचे फारसे काही वाटत नाही. चालानची थकबाकी लक्षात घेता तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅकिंग करण्यासंदर्भात एकसदस्यीय अभ्यास समिती गठीत करण्यात येईल व ती समिती तीन महिन्यांत अहवाल देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













