टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
गेले अनेक वर्षे ज्या जोरावर निवडणुका होत होत्या तो मंगळवेढा 24 गाव सिंचन योजनेला गती देऊन सर्व मान्यता घेतल्या असून नवीन दर सूची प्रमाणे येत्या कॅबिनेट मध्ये मान्यता देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आवताडे शुगर डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदुर येथे प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी खा.जयसिद्धेश्वर महास्वामी, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.राम शिंदे, आ.सचिन कल्याणशेट्टी, माजी आ.प्रशांत परिचारक, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदीजन उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आ.समाधान आवताडे यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. महात्मा बसवेश्वर स्मारक व संत चोखामेळा स्मारक येत्या काळात पूर्ण होणार आहे.
येत्या काळात सर्व मागण्या पूर्ण करून परत निवडणुकीसाठी ताट मानेने निवडून येता येईल असे काम आवताडे हे करत आहेत.
पंढरपूर ते फलटण रेल्वे सुरू करण्यासाठी येत्या आठ दिवसात निर्णय घेऊ होणार आहे. आज कार्तिक वारी निमित्ताने विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन अतिशय पुण्य कार्य करून मी आवताडे शुगर येथे आलो आहे.
पांडुरंग हा सामान्य माणसाचा, कष्ट करी शेतकऱ्यांचा देव आहे. त्यामुळे यांना सुजलाम सुफलाम व्हावे असे साकडं विठ्ठलाकडे मागितले आहे.
आवताडे यांनी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी हा कारखाना घेतला
आ.समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी हा कारखाना घेतला आहे, नफा मिळवण्यासाठी घेतला नाही. कारखाना सुरू झाली की शेतकरी, मजूर व सामान्य माणसाचे दिवस बदलत असतात त्यामुळे कारखाना सुरू केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे सध्या कारखानदारी जिवंत
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे सध्या कारखानदारी जिवंत आहे. एफआरप चे भाव देखील वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मिनिमम सेलिंग किंमत देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मिनिमम सेलिंग किंमत वाढवल्यानंतर शेतकरी व कारखानदारांना फायदा झाला.
ब्राझील देश हा साखर मोठ्या प्रमाणात उत्पादन करते त्यामुळे भाव वाढत नाहीत. इथेनॉल पॉलिसी अमलात आणून शेतकऱ्यांना व कारखानदारांना फायदा झाला. आमच्या शेतकऱ्यांच्या भरावस्यावर इथेनॉल निर्मिती होत आहे.
जेवढे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यासाठी घेतले तेवढे निर्णय आत्तापर्यंत कोणीच घेतले नाहीत असे विरोधकांनी देखील मान्य केले आहे.
65 मिलिमीटरची अट रद्द करून शेतकऱ्यांना मदत
65 मिलिमीटरची अट रद्द करून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आम्ही केली आहे. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी त्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
शेतकऱ्यांना 50 हजाराजांचे अनुदान आम्ही दिले.
महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेली 50 हजाराजांचे अनुदान आम्ही दिले. एका क्लिक वर पैसे दिले, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार काम करत आहे.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी राज्य सरकार येत्या काळात नवी संकल्पना सुरू करत आहोत. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना मदत होईल असे ते म्हणाले.
उजनीचे पाणी आता कोणी पळवून घेऊन जाणार नाही : पालकमंत्री विखे पाटील
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले की, उजनीच्या पाण्यावर अधिकार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे हे पाणी आता कोणी पळवून घेऊन जाणार नाही असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या अथक परिश्रम व आशीर्वादाने हा कारखाना मंगळवेढा येथील शेतकऱ्यांसाठी समाधान आवताडे यांनी सुरू केला आहे.
शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा कारखाना सुरू
शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा कारखाना सुरू केला आहे. समाधान आवाताडे हे विधानसभेत बोलायला लागल्यानंतर पुढचा व्यक्ती समाधानी झाल्याशिवाय शांत बसत नाहीत.
मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी खूप निधी खेचून आणला
मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी खूप निधी खेचून आणला आहे. जी साखर 1800 ते 1900 पर्यंत विकत होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे त्याची योग्य किंमत ठरली त्यामुळे कारखानदारी टिकली आहे.
केवळ इथेनॉल आले म्हणून कारखानदारी टिकली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची कारखानदारी राहिली पाहिजे. कारखानदारी विकत घेऊन चालवने हे मोठे धाडसाचे काम आहे.
आ.आवताडे बोलताना म्हणाले की, आवताडे शुगर हा केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सुरू झाला आहे. हजारो कामगारांच्या हाताला काम देणारी ही संस्था बंद पडता काम नये सुरू करण्यासाठी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
अत्यंत बरील लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांचे मतदारसंघावर
718 कोटींचा निधी पाणी उपसा सिंचन योजनेस मिळणार असून अत्यंत बरील लक्ष आपल्या मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे. त्यासाठी अनेक त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले व येणाऱ्या काळात आपल्या हस्तेच उद्घाटन व्हावे असे आ.आवताडे म्हणाले.
हे प्रश्न मार्गी लावाव्यात अशी मागणी
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रावर कोल्हापूर पद्धतीचे बेरेजस, मंगळवेढा व पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर एमआयडीसीचा प्रकल्प, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक व संत चोखामेळा स्मारक हे प्रश्न मार्गी लावाव्यात अशी मागणी देखील केली आहे.
पौट साठवण तलाव 13 ते 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळावी व पौट साठवण तलाव 13 ते 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. माण नदीला कॅनालचा दर्जा द्यावा.
तीर्थक्षेत्र आराखड्यात नागरिकांचे कोणतेच नुकसान न होता विकास होणार
पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यात नागरिकांचे कोणतेच नुकसान न करता विकास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी हा कारखाना घेतला
उसाच्या दराबाबत बोलताना म्हणाले कि, कारखाना पैसे मिळवण्यासाठी घेतला नाही शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी हा कारखाना घेतला आहे.
सर्व कारखान्यापेक्ष्या जादा दर देणार
सर्व कारखान्यापेक्ष्या जादा दर देणार असून प्रत्येक शेतकऱ्यांना दर वेळेवर देण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज