टीम मंगळवेढा टाईम्स ।
टमटम चालकाने भरधाव वेगाने टमटम चालविल्याने कुत्रे आडवे येवून टमटम पलटी होवून त्यामधील
टमटम मालक हरी शिंदे हा इसम मरण पावला असून याप्रकरणी टमटम चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मरवडे येथील हरी नामदेव शिंदे (वय ५५) यांचे (एम एच ४५ , ए .एफ १९८८) या क्रमांकाचे मालवाहतूक टमटम असून
या टमटमवर भाऊसाहेब उर्फ पिंटू अशोक इंगळे हा चालक म्हणून कार्यरत आहे.
दि.१६ जून रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सदर मयत हरी शिंदे व टमटमचालक भाऊसाहेब इंगळे हे दोघे
मंगळवेढा – डोंगरगाव रोडवरील राधे राधे नगर येथील शेतवस्तीवर ज्वारीची पोती खाली करून परत मंगळवेढयाकडे येत असताना
एकवीरा माळाजवळील कृषी कार्यालयाजवळ आल्यानंतर टमटमचालक भाऊसाहेब इंगळे हा टमटम भरधाव वेगाने चालवत असताना
अचानक समोर कुत्रे आडवे आल्याने त्याचा टमटमवरील ताबा सुटून सदर टमटम रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात पलटी होवून हरी शिंदे हे गंभीर जखमी झाले.
उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
या प्रकरणी अमोल दामोदर घुले यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी भाऊसाहेब इंगळे विरूध्द टमटम वाहन हयगयीने, बेदकारपणे ,
निष्काजीपणाने भरधाव वेगाने चालवून पलटी करून हरी शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज