मंगळवेढा टाईम्स न्युज।
नगराध्यक्ष थेट जनतेतून नगराध्यक्ष व १९ नगरसेवक पदाच्या उमेदवार निवडणुकीसाठी आज मतदान होत असून गेल्या २० दिवसापासून कडाडणाऱ्या तोफा शुक्रवारी रात्री थंडावल्या आहेत.
मात्र सोशल मीडियातून उमेदवारांचा प्रचार सुरूच राहिला आहे. सद्यस्थितीला वैयक्तिक भेटीगाठी यावर उमेदवारांनी भर दिला असून थंडीच्या दिवसातही निवडणुकीमुळे शहराचे वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

आज शनिवारी शहरातील वेगवेगळ्या ७ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येणार असून २९ बूथवर २८ हजार ६३४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार व १० प्रभागातून १९ नगरसेवक पदासाठी ५८ उमेदवार निवडणुक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधील एक उमेदवार बिनविरोध निवडून आले. शुक्रवारी दुपारी शहरातील मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहोच करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काल रात्री पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढला होता.

मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला आहे. मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक ही पक्ष ध्येयधोरणे, शहराचा विकास, शहरातील प्रश्न यावर न होता.

वैयक्तिक टीकाटिप्पणी, हेवेदावे राजकीय हितसंबंध यांच्यावर होताना दिसून आले आहे. शहरामध्ये पूर्वीपासूनच राजकारण हे गटातटावर अवलंबून असते, आता ती व्यक्ति केंद्रित झाली असल्याचे दिसून आले.
पहिले मतदान करून घ्या!
मंगळवेढ्यात मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केले जात आहे. प्रचारात नेते व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.

आता आज मतदानाच्या दिवशी कोणती खबरदारी घ्यावी, याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून ओळखीचे, सक्रिय कार्यकर्ते द्यावेत, अशी चर्चा आहे.
निवडणुकीच्या धावपळीत प्रतिनिधींचे मतदान राहू नये म्हणून ‘आधी स्वतः मतदान करून घ्या’ अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











