मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अंगाची लाही लाही करून टाकणाऱ्या उन्हाळ्यात आज २ व ३ जून रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसम स्थिती राहणार आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराच्या बाहेर जाऊ नये, शिवाय योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नेहमीप्रमाणे यंदाचा उन्हाळाही प्रकर्षाने जाणवत आहे. मार्च २०२३ मध्ये खऱ्या अर्थाने उन्हाला सुरुवात झाली. मार्च महिन्यात तापमान हळूहळू वाढत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते.
एप्रिल महिन्यात हे तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मे महिन्यात तापमाआचा पारा वाढून ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. मे महिन्यात ४३.५ अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तपमानाची नोंद झाली.
तीन वेळा सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून दररोजच्या उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळी सातपासून सूर्याची किरणे पडतात; मात्र कोवळ्या उन्हाचा आहेत. प्रकार दिसून येत नाही. सकाळी आठपासूनच कडक उन्हाला सुरुवात होते.
दिवस जसा चढेल तसा उन्हाचा पारा वाढत जातो. रस्त्यावरून जाणाऱ्या व वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.
दुपारी ४.३० ते ५ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवते. त्यानंतर ऊन कमी होण्यास सुरुवात होते. मात्र रात्रीपर्यंत उन्हाची धग सध्या जाणवत आहे.
अशा अवस्थेमध्ये सध्या मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने इशारा दिला आहे. दोन दिवसांत जिल्ह्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसम स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
ही घ्यावी काळजी
उष्णतेच्या लाटेसम स्थिती निर्माण होणार असल्याने नागरिकांनी गरजेशिवाय उन्हात जास्त फिरू नये. घराच्या बाहेर पडावे लागत असेल तर उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी तयारी करावी.
डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती कपड़ा गुंडाळावा. सोबत पाणी, लिंबू पाणी किंवा ओआरएस ठेवावे. उन्हाचा त्रास होत असेल तर तत्काळ झाडाखाली थांबावे. शक्यतो जास्त वेळ उन्हात राहणे टाळावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.(स्रोत:लोकमत)
उन्हामुळे अशक्तपणा आल्यास किया सावलीच्या ठिकाणी त्रास झाल्यास नागरिकांनी तत्काळ आरोग्य केंद्रात जावे. उन्हामुळे डिहायड्रेशन झाल्यास आपल्या जवळच्य डॉक्टरांकडे जावे व योग्य ती काळजी घ्यावी. – शक्तिसागर ढोले, प्राधिकरण अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज